सावरकरांचे बहुतांश भक्त, अनुयायी हे ढोंगी असतात. त्यांना फक्त बोटीतून उडी मारलेले, अंदमानात काही काळ शिक्षा भोगलेले आणि अस्मिता गोंजारणारे हिंदुत्ववादी वगैरे सावरकरच प्रिय असतात. नंतरच्या काळात त्यांनी मांडलेल्या सुधारणावादी विचारांची अमंलबजावणी करणारा मला त्यांचा एकही अनुयायी आजवर सापडला नाही. किंबहुना त्यांना ते विचार माहीतही नसतात.
सावरकरांनी लिहिलेल्या 'विज्ञाननिष्ठ निबंध' आणि 'क्षकिरणे' या दोन पुस्तकातील काही उदाहरणेच पहा...
असे आणखी अनेक दाखले देता येतील. तूर्तास एवढे पुरे.
सावरकरांच्या हिंदुत्ववादी संघोट्या भाजपेई अंधअनुयायांनो, आहे हिम्मत सावरकरांचे हे विचार स्वीकारायची?
उलट सावरकरांच्या भक्तांपेक्षा आम्ही बरे. आम्ही त्यांच्या एकुण जीवन प्रवासातील जे चुकीचे त्याला चूकच म्हणतो आणि त्यांनी जे काही चांगले, सुधारणावादी विचार मांडले ते तर आम्ही अमलात आणीतच असतो. कारण आम्ही बिनडोक अंधभक्तांसारखे सावरकरांना देवत्व देऊन त्यांचे देव्हारे माजवत नाही तर त्यांना माणूसच समजतो आणि माणसाच्या हातून चुका होत असतात हे समजून घेतो. त्यामुळे घरादारात केवळ दिखाव्यासाठी सावरकरांचा फोटो लावून कंठाळी देशभक्तीचे उमाळे काढण्याचे ढोंग आम्हाला जमत नाही. म्हणून सावरकरांच्या चुकांवर अंधभक्तांसारखे पांघरूण घालण्याचे महापातकही आम्ही करत नाही. कारण इंग्रज सरकारच्या पायाशी दाती तृण धरून गयावया करणाऱ्या माफीला क्षमा नाही.
कुठे तो कम्युनिस्ट विचारसरणीचा भारतमातेचा धगधगता अंगार असलेला भगतसिंग आणि कुठे संकुचित हिंदुत्ववादी विचारसरणीचा विझलेला अंगार असलेले सावरकर! दोघेही क्रांतिकारी, पण एक सच्चा तर दुसरा लुच्चा!! एक निधड्या छातीने मरणाला सामोरा जाणारा तर दुसरा मरणाला घाबरून माफी मागणारा!!!
JK
No comments:
Post a Comment